PowerPoint Presentation

Published on Slideshow
Static slideshow
Download PDF version
Download PDF version
Embed video
Share video
Ask about this video

Scene 1 (0s)

संपूर्ण नाव- आर्यन मंदार काळोखे. इयत्ता – नववी ‘अ‘. शाळेचे नाव – न्यू इंग्लिश स्कुल , लांजा . मोबाईल नं. 9168599608. घरचा पत्ता – रुम नं.२०३, दुसरा मजला, हर्षला अपार्टमेंट, गोंडेसखल रोड,लांजा,जि.रत्नागिरी. ४१६७०१..

Scene 2 (16s)

तुळस हे भारतातील एक पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेले एक बहुपयोगी रोपटे आहे. भारतात हिन्दी धर्मीयांच्या प्रत्येक घरासमोर तूम्हास तूळस नक्कीच दिसेल. तुळस वृंदावनास माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे तूळस भारतीयांच्या मनाशी जूळलेले रोपटे आहे. त्यामूळे यास सर्वत्र एक खास महत्व असते.

Scene 3 (58s)

५. डोळ्यांची समस्या- डोळ्यांच्या समस्यांवर तुळशीच्या काळ्या पानांचा रस महत्त्वाची भूमिका निभावतो. तुळशीच्या काळ्या पानांच्या (कृष्ण तुळस) रसाचे काही थेंब डोळ्यात टाकल्याने दाहकात कमी होण्यास मदत होते. ६. दातांची समस्या- तुळशीच्या पानांची पावडर मोहरीच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करून या पेस्टने दात घासावेत. यामुळे हिरड्या, दात दुखणे यावर तात्काळ उपचार होतो. ७. त्वचेच्या समस्या- त्वचेच्या समस्यांवरही तुळशीच्या पानांचा रस गुणाकारी आहे. ८. कीटक चावणे- डास आणि इतर कीटकांचे चावणे मुख्यत: मान्सूनच्या महिन्यात अशा समस्या वाढतात. अशावेळी ज्या ठिकाणी किटक चावला आहे तेथे तुळशीच्या मुळांची पेस्ट लावावी. ९. किडनी स्टोन- किडनी स्टोनच्या समस्येला सामोरे जाणाऱयांनी मध आणि तुळशीच्या पानांच्या रस मिश्रित मिश्रण प्यावे. १०. मानसिक तणाव- रोजच्या धाकाधकीच्या जीवनात मानसिक तणाव निर्माण होणे हेही रोजचे झाले आहे. तणाव विरहीत जीवन जगण्यासाठी रोज १० ते १२ तुळशी पाने रोज खावीत. तुळशीची पाने तणावावर मात करणारे शस्त्र म्हणून काम करतात..

Scene 4 (1m 51s)

आवळा. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिवाय आवळ्यात इतरही अनेक औषधी गुणधर्म असल्याने ते एक आरोग्यदायी फळ आहे. यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असल्याने पांढर्‍या रक्त पेशींचे प्रमाण वाढते. आपली रोगप्रतिकारशक्ती याच पेशींवर अवलंबून असते..

Scene 5 (2m 27s)

छोट्या-मोठ्या आजारांची सहज लागण होणे म्हणजे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमकुवत आहे, हे लक्षात घ्या. नियमित स्वरुपात आवळ्याच्या रसाचे सेवन करा म्हणजे इम्युनिटी वाढण्यास मदत होईल..

Scene 6 (3m 20s)

कढीलिंब. आयुर्वेदामध्ये कडूलिंबाच्या पानाला खूपच महत्त्व देण्यात आलं आहे. कडूलिंबाच्या वापराने बरेच आजार बरे होतात. कडूलिंबाची पानं भलेही कडू असतात पण मधील अँटिबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीपॅरासिटीकसारखे गुण असतात, जे कडूलिंबाला अतिशय खास बनवतात. भारतामध्ये कडूलिंबाला साधारणतः ‘गावठी औषध’ असं म्हटलं जातं. यामध्ये अनेक गुण आढळतात..

Scene 7 (4m 9s)

या व्यतिरिक्त घरामध्ये ठेवलं जाणारं धन्य अथवा कडधान्यांचं किडे, उंदीर घुशीपासून संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाचा पाला ठेवावा. त्यामुळे किडे, मुग्या आणि उंदराचा त्रास होणार नाही. धान्यही सुरक्षित राहिल. 8. कडुनिंबाचे पानांचा उपयोग शरीरातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना कडुनिंबाच्या पानांचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो..

Scene 8 (4m 48s)

दुर्वा. आपल्याकडे गणपतीपूजनाच्या साहित्यामध्ये दुर्वांचा समावेश अतिशय महत्वाचा आहे. दुर्वांना आयुर्वेदामध्ये महाऔषधीचे स्थान दिले गेले आहे. अनेक पौष्टिक आणि औषधी गुणांनी युक्त दुर्वांचा उपयोग हिंदू धर्मामध्ये पूजा पाठासाठी तर होतोच, पण त्याशिवाय या दिव्य औषधीमध्ये यौनरोग, लिव्हरशी निगडीत आजार, बद्धकोष्ठ या व्याधी बऱ्या करण्याची क्षमता आहे.

Scene 9 (5m 29s)

खाण्या-पिण्याच्या चूकीच्या सवयींमुळे आजकाल पचनाचे विकार वाढले आहेत. मात्र नियमित दुर्वांचा रस प्यायल्यास पचनमार्गाचे कार्य सुधारते, पोट साफ राहण्यास मदत होते तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करणे शक्य होते. नियमित दुर्वांचा रस घेतल्यास पित्ताचा त्रासही कमी होतो आणि शरीर नैसर्गिकरित्या डीटॉक्स होते..

Scene 10 (6m 17s)

लिंबू. आहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लिंबूचा समावेश केला जातो. आकाराने छोट्या असलेल्या लिंबूमध्ये औषधी गुणधर्मांचा साठा आहे. लिंबूचे सेवन केल्यानं आपल्याला कित्येक आरोग्यदायी लाभ मिळू शकतात. नैसर्गिक स्वरुपात शरीर डिटॉक्स करण्यासाठी तज्ज्ञमंडळी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात..

Scene 11 (6m 59s)

लिंबू रोजच्या आहारातील फळ आहे. लिंबू जितके आंबट असते तितकेच ते आरोग्यवर्धक असते. आरोग्याच्या अनेक समस्या लिंबाच्या सेवनाने दूर होतात. लिंबामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम अन फायबर व्हिटॅमीन सी, बीकॉम्पेक्स, कॅल्शीयम, आयर्न सामावलेले असतात. लिंबू आरोग्यासाठी वरदान आहे. लिंबू पाण्यासोबत सेवन करनेच फायदेशीर आहे..

Scene 12 (7m 39s)

कोरफड. आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व असलेल्या कोरफडीचे मूळ उगमस्थान आफ्रिका व भारतात आहे. ही बहुवार्षिक वनस्पती आहे. कोरफड मध्ये अनेक औषधी गुण आहेत. इतकेच काय आयुर्वेद, चिनी हर्बल मेडिसिन आणि ब्रिटिश हर्बल मेडिसिन यांनी कोरफडीच्या औषधी गुणांची वकिली केली आहे. या वनस्पतीची पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या स्वरूपात साचलेले असते..

Scene 13 (8m 18s)

कोरफडीच्या सेवनाने तोंडाची स्वच्छता राखली जाते. त्यामुळे घश्याच्या आजारापासून मुक्ती मिळते..

Scene 14 (8m 56s)

कढीपत्ता. कडीपत्त्याचा वापर भाजी आणि डाळीला फोडणी, तडक देण्यासोबतच पदार्थाची चव, सुगंध वाढवण्यासाठी होतो. सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या पानांमध्ये भरपूर न्यूट्रिएंट्स असतात, जे आजारांना आपल्यापासुन दूर ठेवतात. कडीपत्ता पोटासाठी खूप फायदेशीर मानला जातो. या व्यतिरिक्त कडीपत्ता आहारात समाविष्ट केल्यास विविध फायदे होऊ शकतात..

Scene 15 (9m 36s)

चुकीचा आहार आणि वयोमानानुसार तुमच्या केसांमध्ये बदल होत असतात. कढीपत्त्यामध्ये असलेले केरेटीन आणि प्रोटीन तुमच्या केसांच्या वाढीसाठी चांगले असते. जर तुम्हाला केसगळतीचा त्रास असेल तर तुमच्यासाठी कढीपत्ता अगदीच योग्य आहे. कढीपत्त्याच्या सेवनामुळे किंवा त्याच्या वापरामुळे तुमचे गेलेले केस परत येऊ शकतात. तुमची केस गळती थांबू शकते. तुम्हाला चमकदार आणि मजबूत केस मिळू शकतात..

Scene 16 (10m 18s)

पारिजातक. पारिजातकाच्या फुलांपासून पानं, साली आणि बियाणं उपयुक्त आहे. याचा चहा, चविष्टच नव्हेतर आरोग्यास देखील फायदेशीर आहे. आपण हा चहा वेग वेगळ्या पद्धतीने देखील बनवू शकता आणि आरोग्य आणि सौंदर्याचे अनेक फायदे मिळवू शकता..

Scene 17 (10m 57s)

हृदयाच्या आजारामध्ये पारिजातकाचे वापर फायदेशीर असतं. याचा 15 ते 20 फुलांच्या रसाचे सेवन केल्याने हृदयाच्या आजारापासून स्वत:चा बचाव करू शकता..

Scene 18 (11m 29s)

सदाफुली. सदाफुली हे बारा महिने फुलणारे फुलांचे रोप आहे. अनेक घरांच्या अंगणात आणि उद्यानातं ही वनस्पती आढळते. हे औषधी रोप असून त्याचे वानस्पतिक नाव कॅथेरेन्थस रोसियस असे आहे. यामध्ये विन्कामाईन, विनब्लास्टिन, विन्क्रिस्टीन, बीटा-सीटोस्टेरॉल अशी महत्त्वपूर्ण रसायने असतात. या रोपांचा आणि फुलांचा औषधी स्वरुपात वापर केला जातो..

Scene 19 (12m 7s)

या रोपाच्या विविध भागांचा वापर ल्युकेमियासारख्या रोगांचे निदान करण्यासाठी करतात. आधुनिक शोधानुसार या रोपाच्या पानांमध्ये आढळून येणारे प्रमुख अल्कलायड रासायानंसारखे विनब्लास्टिन आणि विनक्रिस्टिन रसायन ल्युकेमियाच्या उपचारासाठी उपयोगी मानले जाते..

Scene 20 (12m 46s)

पुदिना. पुदिना चा वापर खूप काळा पासून औषध म्हणून केला जात आहे. आपल्याला सर्दी, डोकं दुःखी असेल तर पुदिना चा चहा पिण्यास सांगितले जाते. परंतु हे मोजक्याच लोकांना माहीत आहे. की पुदिना ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. म्हणून आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत की पुदिना चे आरोग्यासाठी काय फायदे आहेत..

Scene 21 (13m 28s)

सर्दी आणि डोकदुखी हे आपल्याला कधी पण होऊ शकते. याकरिता आपले घरघुती उपाय लाभकारक राहतात. पुदिना चे फायदे हे सर्दी आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी पण आहेत. सर्दीमुळे आपले नाक बंद झालं असेल तर पुदिना मध्ये असलेल्या Menthol ते मोकळं करून आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्यास तो कमी करतो..

Scene 22 (14m 11s)

अडुळसा. अडुळसा सामान्यत: दमा, सर्दी आणि खोकला यासारख्या श्वसन समस्यांसाठी वापरला जातो. मात्र ही वनऔषधी आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयोगी आहे..

Scene 23 (14m 49s)

हवामान बदलल्यास सर्दी आणि फ्लूमुळे वारंवार घशात खवखव जाणवते. शिवाय जळजळ होते आणि घशात खाज येत असल्यासारखी वाटते. अडुळशामध्ये उपस्थित अँटीव्हायरल, अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टीरियल घटक घशाची खवखव दूर करण्यात मदत करतात..

Scene 24 (15m 32s)

अश्वगंधा. अश्वगंधा बहुगुणी वनस्पती आहे, आपण सगळ्यांनी याविषयी ऐकले असेलच. पण अश्वगंधा काय आहे, हे त्याचे गुण काय आहेत. अश्वगंधा एक आयुर्वेदिक औषध आहे, विविध विकारांवर रामबाण उपाय म्हणून अश्वगंधाकडे पाहिले जाते. सर्व रोगनाशक म्हणून जिनसेन च्या तोडीची वनस्पती म्हणून ती ओळखली जाते. ही वनस्पती अश्व शक्तीचे प्रतीक मानले जाते. अश्वगंधाच्या सेवनाने डोक्याचे केस पांढरे होणे ही समस्याही दूर होते..

Scene 25 (16m 21s)

अश्वगंधा पुरुष प्रधान रोगावर गुणकारी असली तरी स्री रोगावरही तितकेच उपयुक्त आहे. अश्वगंधाच्या मुळाची भुकटी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना उत्तम प्रकारचे टॉनिक आहे. मुळांमध्ये असलेल्या अल्कोलाईडमुळे अशक्तपणा, नपुसकत्व नाहीसे होते. तसेच स्त्रियांमध्ये गर्भधारणा होण्यास व पुरुषांमध्ये शुक्र पेशीच्या वाढीस मदत होते. शूज, क्षय,कृमी, कुष्ठरोग त्वचारोग, आमवात, श्वेत प्रदर, कफ,वात, सांधेदुखी, रक्तविकार, या आजारावर मुळ्या उपयोगी आहेत. यांच्या पानांचे दररोज सेवन केल्यास शरीरातील चरबी कमी होते व प्रकृती सडसडीत आणि उत्साहवर्धक राहते..