जगाचा नकाशा.
Prepare.
चला, को सोडवूया..... कल्पनाशक्तीला द्या वाव!. "बाजूला दिलेल्या चित्राचे नीट निरीक्षण करा आणि त्यातील प्रसंगावर आधारित १०० ते १२० शब्दांत एक कल्पक लघुकथा लिहा. कथेला योग्य शीर्षक द्यायला विसरू नका.".
Learn.
आज आपण शिकणार आहोत....... १.ग्लोब(पृथ्वीगोल). २.खंड आणि उपखंड.
पृथ्वीगोल(ग्लोब). पृथ्वीगोल (ग्लोब) म्हणजे पृथ्वीचा लहान आकारातील गोल मॉडेल(प्रतिकृती) होय. यावर पृथ्वीवरील खंड, देश, महासागर आणिअक्षवृत्त-रेखावृत्त(अक्षांश-रेखांश) स्पष्टपणे दाखविलेले असतात..
विषुववृत्त, अक्षवृत्त(अक्षांश) आणि रेखावृत्त(रेखांश).
अक्षवृत्त(अक्षांश) आणि रेखावृत्त(रेखांश) माहिती. अक्षवृत्त(अक्षांश) रेखावृत्त(रेखांश) १. या रेषा पूर्व-पश्चिम दिशेने असतात, परंतु उत्तर-दक्षिण अंतर मोजतात. १. या रेषा उत्तर-दक्षिण दिशेने असतात, परंतु पूर्व-पश्चिम अंतर मोजतात. २. हवामानाचा पट्टा समजण्यासाठी आणि उत्तर किंवा दक्षिणेकडील स्थान निश्चित करण्यासाठी मदत करतात. २. वेळेचा पट्टा समजण्यासाठी आणि पूर्व किंवा पश्चिमेकडील स्थान निश्चित करण्यासाठी मदत करतात. ३. विषुववृत्तापासून (०°) उत्तरेकडे ९०° पर्यंत आणि दक्षिणेकडे ९०° पर्यंत पसरलेल्या असतात. ३. ग्रीनविच रेषेपासून (०°) पूर्वेकडे १८०° पर्यंत आणि पश्चिमेकडे १८०° पर्यंत पसरलेल्या असतात. ४. भूमध्यरेषा (०°), कर्कवृत्त (२३.५° उत्तर), मकरवृत्त (२३.५° दक्षिण), आर्क्टिक आणि अंटार्क्टिक वृत्त. ४. प्राइम मेरीडियन किंवा ग्रिनविच रेषा (०°), आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा (१८०°). ५. सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात, ते कधीही एकमेकांना छेदत नाहीत. त्यांची लांबी भिन्न असते - भूमध्यरेषेवर सर्वात लांब आणि ध्रुवांवर सर्वात लहान असतात. ५. सर्व रेखावृत्ते उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव येथे एकत्र येतात. त्यांची लांबी समान असते. ६. अक्षवृत्त सपाट (आडव्या) रेषा असतात → LATI = FLAT LINES. ६. रेखांश लांब (उभ्या) रेषा असतात → LONG = LONG LINES..
खंड आणि उपखंड.
खंडांची ओळख.
उपखंड. उपखंड म्हणजे काय? उपखंड म्हणजे एका मोठ्या खंडाचा असा विशाल भाग, जो स्वतःमध्येच खूप मोठा असतो. वेगळेपण (निसर्ग): डोंगर, पर्वत (उदा. हिमालय) किंवा समुद्र यांमुळे तो उर्वरित खंडापासून भौगोलिकदृष्ट्या वेगळा झालेला असतो. वेगळेपण (संस्कृती): तिथल्या लोकांची भाषा, राहणीमान आणि परंपरा खंडातील इतर भागांपेक्षा वेगळ्या असतात. उदाहरण: 'भारतीय उपखंड' – जो हिमालयामुळे आशिया खंडापासून वेगळा आणि विशाल वाटतो..
भारताच्या शेजारील देश. क्र. देशाचे नाव अचूक दिशा १ पाकिस्तान पश्चिम आणि वायव्य २ अफगाणिस्तान वायव्य ३ चीन उत्तर आणि ईशान्य ४ नेपाळ उत्तर ५ भूटान उत्तर / ईशान्य ६ बांगलादेश पूर्व ७ म्यानमार पूर्व / आग्नेय ८ श्रीलंका दक्षिण ९ मालदीव नैऋत्य.
Practice.
जगाचा नकाशा. गृहपाठ १. नकाशाचा वापर करून जगातील सर्व महासागरांची यादी तुमच्या वहीत तयार करा. २. भारताच्या सर्व शेजारील देश आणि त्यांच्या राजधानीची यादी तयार करून वहीत लिहा..
चला तर मग… पुढच्या भागात पुन्हा भेटूया एका नव्या मजेदार प्रवासासाठी! 🗺️✨ तयार रहा—नवीन गोष्टी आणि धमाल शिकण्यासाठी! 😄.