
[Audio] घरयादी व घरगणना संबंधित प्रश्न (प्रश्न क्र. 1 ते 16 पर्यंत ) जनगणना कार्यालय, महाराष्ट्र गृह मंत्रालय, भारत सरकार मार्च 2026.
[Audio] सत्राचे उद्दिष्ट क्षेत्रीय कार्यामध्ये एकसारखेपणा आणि अचूकता सुनिश्चित करणे 2.64 लक्ष प्रगणक व पर्यवेक्षक 1 प्रमाणित पद्धत प्रश्नांची विस्तृत चर्चा उत्तर (प्रतिसाद) कसे नोंदवावेत फील्ड ट्रेनर्सना कसे प्रशिक्षित कारवे राज्यातील विशिष्ट काही उदाहरणे समाविष्ट करू शकतात राष्ट्रीय जनगणनेची विश्वासार्हता तिच्या मूलभूत संकल्पनांविषयी असलेल्या एकसमान आणि सामायिक समजुतीवर अवलंबून असते. विविध क्षेत्रांतील हजारो अधिकारी प्रत्येक व्याख्येचा समान अर्थ लावतील आणि त्याची एकसारखी अंमलबजावणी करतील, हे सुनीचित होणे गरजेचे आहे आणि कोणत्याही प्रकारच्या संदिग्धतेस येथे स्थान नाही. निर्दोष सुसंगतता साध्य करणे हेच आपले उद्दिष्ट आहे..
[Audio] घरयादी व घर गणना प्रश्न 2026 श्रेणी प्रश्नाचे विषय घराची / निवासाची स्थिती जमीन , भिंत आणि छप्पर यांसाठी मुख्यत: वापरलेले साहित्य, गणना घराचा वापर आणि स्थिती, कुटुंब प्रमुख, मालकी हक्क, खोल्यांची संख्या, विवाहित जोडप्यांची संख्या उपलब्ध असलेल्या सोयी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत, प्रकाशाचा मुख्य स्त्रोत, शौचालय सुविधा, निचरा (ड्रैनेज) जोडणी, स्नानगॄह, स्वयंपाकघर, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन धारण केलेली मालमत्ता रेडिओ/ट्रान्झिस्टर, दूरचित्रवाणी, संगणक/लॅपटॉप, दूरध्वनी/मोबाइलफोन/स्मार्ट फोन, सायकल, स्कूटर/मोटारसायकल/मोपेड, कार/जीप/व्हॅन, इंटरनेटचा वापर (सुविधा) इतर कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य, मोबाइल क्रमांक.
[Audio] स्थानासंबंधी तपशील कसे भरावे. स्थानासंबंधी तपशील कसे भरावे.
[Audio] ओळ क्रमांक ओळ क्रमांक निष्क्रिय आहे आणि स्वयं चालित पद्धतीने वाढत जातो हे HLO अॅपच्या पुढे येणाऱ्या सर्व स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात दर्शविले जाईल..
[Audio] इमारत क्रमांक कृती : अधिकृत स्थानिक क्रमांक जसे आहेत तसे नोंद करा. नवीन जनगणना क्रमांक देऊ नयेत.
[Audio] कृती : जिथे क्रमांक नाही किंवा अपूर्ण आहेत, तिथे अनुक्रमांकानुसार जनगणनेचे इमारत क्रमांक देणे.
[Audio] . इमारत क्रमांक. Clarifying What Is Not a Building Open plots, construction sites without roofs, or any structure that Correct Incorrect Focus Zone Call-out Common Pitfall: Municipal Numbers vs. Census Structures Local authorities may assign numbers to open plots for property reasons. Do not give these a Census Building Number. A Census Number is only assigned to an actual structure..
[Audio] घर क्रमांकन म्हणजे घरयादी गटामध्ये असलेल्या प्रत्येक इमारत आणि गणना घराला अनुक्रमे आणि नियमित पद्धतीने दिलेला क्रमांक असावा याची खात्री करणे. इमारत क्रमांकन प्रोटोकॉल.
[Audio] . इमारत क्रमांक.
[Audio] गणना घराचा क्रमांक गणना घर हे गणनेचे मूलभूत एकक आहे. प्रत्येक घरयादी गटामधील प्रत्येक गणना घराला एक अद्वितीय आणि अनुक्रमिक (sequential) क्रमांक दिला जातो लक्ष्य द्या.
[Audio] ✓ Note: one building may have more than one Census Houses. Not to miss..
[Audio] इमारत व गणना घर छप्पर असणे आवश्यक आहे खुले भूखंड समाविष्ट नाहीत सर्वप्रथम अधिकृत स्थानिक क्रमांक वापरा इमारत क्रमांक उपलब्ध नसल्यास, जनगणना क्रमांक नियमित पद्धतीने देणे नव्याने सापडलेल्या इमारतींना उपक्रमांक देण्यात येईल(उदा. 10/1) गणना घर इमारत नेहमी ४-अंकी क्रमांक असेल (उदा. 0001) संपूर्ण घरयादी गटासाठी एकच सलग क्रमांक वापरला जातो क्रमांक 0001 पासून सुरू होतो प्रत्येक नवीन इमारतीसह क्रमांकन पुन्हा सुरू होत नाही नव्याने सापडलेल्या इमारतींमधील घरांना (उदा. 10/1) घरयादी गटामधील शेवटच्या गणना घरानंतरचे सलग क्रमांक दिले जातात (उदा.0154, 0155).
[Audio] स्व-गणना संदर्भ आयडी (SE ID): गणना घर क्रमांक नोंदवल्यानंतर ‘पुढे जा’ बटणावर क्लिक केल्यास, पुढील संदेश दर्शविली जाईल. “कुटुंबाने स्व-गणना (Self-enumeration) पूर्ण केली आहे का?” - ‘होय’ किंवा ‘नाही’ जर कुटुंबाने स्व-गणना पूर्ण केली असेल, तर ‘होय’ (Yes) निवडा आणि त्यानंतर प्र.7 (गणना घराचा वापर) दोन पर्यायासह उपलब्ध होईल - 1. निवास आणि 2. निवासासह इतर वापर. प्र.9 (कुटुंब क्रमांक) प्रणालीद्वारे आपोआप तयार (auto-generated) केला जाईल. स्व-गणना संदर्भ आयडी (SE ID) उत्तरदात्याकडून मिळवून दिलेल्या चौकटीत प्रविष्ट करावा. जर SE आयडी उपलब्ध SE आयडीशी जुळत असेल, तर संबंधित कुटुंबाची माहिती मोबाईल अॅपमध्ये प्रदर्शित होईल. माहितीची अचूकता तपासून प्रगणकाने “स्वीकारा आणि सादर करा” किंवा “एडिट” हा पर्याय निवडावा. जर कुटुंबाने स्वयं-गणना केलेली नसेल, तर प्रगणकाने “नाही” निवडून मोबाईल अॅपमध्ये संपूर्ण माहिती नोंदवावी..
[Audio] प्र 4: जामिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य प्रमुख साहित्य म्हणजे जास्तीत जास्त वापर ज्या साहित्याचे झाले आहे ते बहुमजली इमारतीतील इमारतीमध्ये जमिनीचे साहित्य वेगवेगळे असू शकते. बहुमजली इमारतींमध्ये प्रत्येक गणना घराच्या जमिनीचे साहित्य स्वतंत्रपणे नोंदवावे..
[Audio] प्र 5: भिंतीसाठी वापरलेले साहित्य प्रमुख साहित्य म्हणजे जास्तीत जास्त वापर ज्या साहित्याचे झाले आहे ते संकेतांक 1 ते 5 हे कायमस्वरूपी नसलेल्या साहित्यांना दर्शवितात. उर्वरित संकेतांक 6 ते 9 हे कायमस्वरूपी स्वरूपाच्या साहित्यांना दर्शवितात. बाहेरील पृष्ठभाग प्लास्टर करून रंगवलेला असल्यामुळे भिंतीचे साहित्य निश्चित करणे अनेकदा कठीण होते बाहेरील पृष्ठभाग प्लास्टर करून रंगवलेला असल्यामुळे भिंतीचे साहित्य ओळखणे कठीण असल्यास, ते चौकशी करून निश्चित करावे. EKRA.
[Audio] उत्तरदात्याला भिंतीच्या साहित्याबाबत माहिती नसल्यास, संकेतांक ‘0’ नोंदवा भिंती सैल दगडांपासून बनलेल्या असू शकतात. जर दगड चुना किंवा सिमेंट मोर्टारने व्यवस्थित भरलेले नसतील, तर संकेतांक ‘5’ निवडावा. जर भिंती दगडांनी बांधलेल्या असून ते चुना किंवा सिमेंट मोर्टारने व्यवस्थित भरलेले असतील, तर संकेतांक ‘6’ निवडावा भिंत मातीची किंवा कच्च्या विटांची असू शकते. तथापि, ती सिमेंटने प्लास्टर करून रंगवलेली असू शकते.
[Audio] प्र 5: भिंतीसाठी वापरलेले साहित्य DSC00440 टीप : 2 प्रकारचे भिंती जास्तीत जास्त वापर होत असलेले तपासून त्याचा संकेतांक द्यावा.
[Audio] प्र 6: छप्परासाठी वापरलेले साहित्य C:\Users\Administrator\Downloads\tile\downloadfile.jpg C:\Users\Administrator\Downloads\tile\4520123-background-perspective-of-red-roof-clay-tiles.jpg C:\Users\Administrator\Downloads\tile\machine_pantiles1 (1).jpg C:\Users\Administrator\Downloads\tile\clay-tile-hero-tcm52-2147314.jpg यंत्राणी बनविलेली कौले (संकेतांक 4) हाताने बनविलेली कौले (संकेतांक 3) प्रमुख साहित्य म्हणजे जास्तीत जास्त वापर ज्या साहित्याचे झाले आहे ते संपूर्ण घराचे छप्पर कंक्रीटचे असू शकते. तथापि, अशा वेळी तेथे अस्थायी बांधकाम असू शकते ज्याचे छप्पर गवताचे आहे. अशा परिस्थितीत, छप्पराचे साहित्य कंक्रीट मानले जावे. खपरैल/कवेलु/खपरा ही पारंपरिक पद्धतीने हाताने बनविलेली कौले आहेत.
[Audio] DSC00430 स्लेट प्रमुख साहित्य शिंगल असेल तर त्याला स्लेट मानावे..
[Audio] Q 6: Material of Roof खालच्या मजल्याचे छप्पर लाकडी असले तरी, वरच्या मजल्याचे छप्पर कंक्रीटचे असल्यास, अशा परिस्थितीत गणना घराचे छप्पर ‘कंक्रीट’ मानले जावे. जर प्रत्येक मजला स्वतंत्र गणना घर म्हणून वापरला जात असेल, तर खालच्या मजल्यावरील गणना घरासाठी छप्पर लाकडी असेल, तर वरच्या मजल्यावरील गणना घरासाठी छप्पर कंक्रीटचे असेल.
[Audio] शंका : भिंत आणि छप्पर 49-51-07 http://images.travelpod.com/users/dan.melanie/1.1254017681.cabins-at-the-kosrae-village-resort.jpg प्रमुख साहित्य : छप्परासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य ?.
[Audio] प्रश्न : भिंत आणि छप्पर 49-51-07 छप्पर : हाताने बनविलेली कौले (संकेतांक 3) भिंत : पकक्या वीटा (संकेतांक 8) टीप: कौलांवर प्लास्टिक /पॉलीथिन आणि विटांचा वापर केलेला आहे.
[Audio] प्रश्न : भिंत आणि छप्पर http://images.travelpod.com/users/dan.melanie/1.1254017681.cabins-at-the-kosrae-village-resort.jpg Predominant material: भिंत : बांबू (संकेतांक 1) छप्पर : वाळवलेले गवत (संकेतांक 1).
[Audio] j7 jj प्रमुख सामग्री भिंत: गवत / छप्पर / बांबू (संकेतांक 1) छप्पर: जीआय / मेटल / अॅस्बेस्टोस शीट (संकेतांक 8) भिंत: पक्क्या वीटा (कोड 8) छप्पर : यंत्राने बनवलेली कौले / हाताने बनवलेली केलेल्या जे असेल त्या प्रमाणे संकेतांक द्यावा.
[Audio] प्र .7 गणना घरच्या वापरासंबंधी खात्री करा मोठ्या बाजारपेठेत, दुकाने किंवा कार्यालयांमध्ये काम करणारे लोक (गड्डी) याचा उपयोग रात्री राहण्यासाठीही करतात. अशा ठिकाणांना ‘निवासा सह दुकान’ किंवा ‘निवासा-सह-कार्यालय’ असे मानले जाईल. निवासाव्यतिरिक्त इतर वापर असल्यास ते प्रविष्ट करावे— उदा. किराणा दुकान, कपड्यांचे दुकान, औषधीचे दुकान इत्यादी. निवासा सह इतर वापर निवासाव्यतिरिक्त निवासी गणना घराचे वापरानुसार वर्गीकरन.
[Audio] प्र 7. गणना घरच्या वापरासंबंधी खात्री करा गणना घरांचा वापर हंगामी उपक्रमांसाठी होऊ शकतो, हे उपक्रम आपण घरांची यादी करत असताना बंद असू शकतात, जसे की तेलघाणी (घाणी), गुळ तयार करणे (गुर बनवणे) इत्यादी — अशा उपक्रमांची चौकशी करून ओळख करावी. जर एखादे हॉटेल, लॉज किंवा गेस्ट हाऊस तेथील रहिवाशांनी नियमित निवासस्थान म्हणून वापरले असेल, तर त्या ठिकाणाला अनुक्रमे ‘निवासासह हॉटेल’ / ‘निवासासह लॉज’ / ‘निवासासह गेस्ट हाऊस’ असे नमूद करावे. जर गणनाघर संस्थात्मक स्वरूपाचे (Institutional Household) असेल, तर ‘संस्थात्मक’ या चिन्हाचा वापर करावा . अशा वेळी फक्त प्रश्न क्रमांक 1 ते 11 पर्यंतची माहिती भरायची आहे. या प्रकरणात प्रश्न 9 मध्ये संस्थात्मक गणनाघरासाठी अॅप गणनाघर क्रमांक “999” स्वयंचलितपणे देईल..
[Audio] प्र 8: Condition of the Census House फक्त यांना लागू आहे: सामान्य कुटुंब निवासी किंवा निवासासह इतर वापर असलेले गणना घर. चांगले (Good) – संकेतांक ‘1’ ज्या घरांना कोणत्याही दुरुस्तीची गरज नाही. गणना घर मजबूत आणि उत्तम स्थितीत आहे. “चांगले” निवडा आणि संकेतांक ‘1’ नोंदवा. राहण्यासयोग्य (Livable) – संकेतांक ‘2’ ज्या घरांना किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे. गणना घर वापरण्यास योग्य आहे, परंतु थोडी देखभाल आवश्यक आहे. “राहण्यायोग्य” निवडा आणि संकेतांक ‘2’ नोंदवा. मोडकळीस आलेली (Dilapidated) – संकेतांक ‘3’ जी घरे जीर्ण , पडझड झालेली किंवा जी मोठ्या दुरुस्तीशिवाय वापरण्यास अयोग्य आहेत. जी घरे पुन्हा दुरुस्त करणे शक्य नाहीत, तीही याच श्रेणीत येतात. “मोडकळीस” निवडा आणि संकेतांक ‘3’ नोंदवा. वरील वर्गीकरण हे केवळ उत्तरदात्याच्या मार्गदर्शनासाठी आहे. अंतिम नोंद उत्तरदात्या ने सांगितलेल्या स्थितीनुसारच करायची आहे..
[Audio] प्र. 9 : कुटुंब क्रमांक हा रकना स्वयंचलित (Auto-incremented) असून संपादन करता येत नाही. ज्या गणना घरांचा वापर “निवासासाठी” किंवा “निवाससह इतर वापरासाठी” होतो, त्यांना अॅपमध्ये स्वयंचलितपणे कुटुंब क्रमांक दिला जाईल. जर पर्याय “निवाससह इतर वापरासाठी” आणि “संस्थात्मक कुटुंब” असेल, तर अॅप त्याला संस्थात्मक कुटुंबाचा “999” हा क्रमांक देईल. जर पर्याय “निवाससह इतर वापरासाठी” आणि “बंद” असेल, तर अॅप कुठलाही कुटुंब क्रमांक देणार नाही. जर पर्याय “निवाससह इतर वापरासाठी”, “संस्था कुटुंब” आणि “बंद” (दोन्ही) असेल, तर घर बंद असल्यामुळे अॅप कुटुंब क्रमांक देणार नाही..
[Audio] प्र. 10 : एकूण व्यक्तींची संख्या सामान्य तसेच संस्था कुटुंबामध्ये सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तींची नोंद करावी. सर्व व्यक्तींचा समावेश करा: बालक आणि वयोवृद्ध व्यक्ती देखील. दिव्यांग व्यक्तींना देखील न विसरता समविष्ट करावा भेटीच्या दिवशी काही व्यक्ती अनुपस्थित असल्या तरीही सामान्यतः येथे राहणाऱ्या सर्व रहिवाशांचा समावेश केला जाईल. अनौपचारिक/तात्पुरत्या भेट देणाऱ्या व्यक्तींचा समावेश करू नये..
[Audio] प्र. 11 ते 13 : कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती प्र.11 – कुटुंब प्रमुखाचे नाव: कुटुंब प्रमुख म्हणजे अशी व्यक्ती असते जी कुटुंबामध्ये प्रमुख म्हणून ओळखली जाते. ती व्यक्ती कुटुंबातील मुख्य निर्णय घेणारी असते. ती व्यक्ती कुटुंबाच्या देखभालीची मुख्य जबाबदारी घेते. जर संस्थात्मक कुटुंबासाठी असेल (उदा. वसतिगृह, कारागृह, रुग्णालय), तर संस्था कुटुंबप्रमुखाच्या नावाऐवजी संस्थेतील पदनाम प्रविष्ट करावे. प्र.12. कुटुंब प्रमुखाचे लिंग प्रकार नोंदवावे. प्र.13. कुटुंब प्रमुखासाठी अनुसूचित जाती / अनुसूचित जमात / इतर प्रवर्ग नोंदवावे..
[Audio] प्र.13: अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / इतर लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी संबंधित राज्य / केंद्रशासित प्रदेशासाठी (State / UT) लागू असलेल्या अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांची यादी उपलब्ध असेल. कुटुंब प्रमुखाने सांगितलेली जात / जमातीचे नाव पुरविलेल्या यादीशी तपासून पाहावे. अनुसूचित जाती (SC) — फक्त हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मीयांमध्येच असू शकतात. अनुसूचित जमाती (ST) — कोणत्याही धर्मातील व्यक्ती असू शकतात. टीप: कुटुंबप्रमुखाचा प्रतिसाद त्यांचा धर्म विचारून देखील पडताळून पाहता येऊ शकतो. जर कुटुंबप्रमुख अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींपैकी कोणत्याही प्रवर्गात मोडत नसेल, तर संकेतांक 3 निवडा..
[Audio] प्र. 14 : घराच्या मालकीहक्काची स्थिति स्वतःचे घर: संकेतांक 1 ज्या कुटुंबांकडून भाड्याच्या स्वरूपात कोणतेही पैसे किंवा वस्तू दिल्या जात नाहीत. हप्त्यांमध्ये पैसे भरून मालकी हक्काने घेतलेले घर किंवा फ्लॅट. भाड्याचे घर: संकेतांक 2 किंवा 3 भाडे रोख रक्कमेत किंवा वस्तूरूपाने दिले जाते. मालकाने भाड्याने दिलेले निवासस्थान. भाड्याने घेतलेले पण सध्या भाडे न देणारे घर. सरकारी घर किंवा तत्सम निवासस्थान. मालकी – इतर कोणतीही: संकेतांक 4 मालकाद्वारे मोफत दिलेले निवासस्थान. बेकायदेशीररीत्या बांधलेल्या जमिनीवर उभारलेली घरे. सोडून दिलेल्या इमारतींमध्ये अनधिकृतरीत्या राहणारी कुटुंबे. नैसर्गिक आडोशामध्ये (उदा. गुहा, पूलाखाली इ.)..
[Audio] Q 15: Number of dwelling rooms निवास योग्य खोल्या भोजन कक्ष/खोली दिवाण खाणा / उठण्या-बसण्याची खोली नोकरची खोली झोपण्याची खोली अभ्यासाची खोली.
[Audio] प्र. 15 : कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या निवासायोग्य खोल्यांची संख्या राहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खोल्यांमध्ये समाविष्ट नाहीत: स्वयंपाकघर साठविण्याची खोली स्नानगृह येण्याजाण्याचा मार्ग शौचालय व्हरांडा जर गणना घरात एकच खोली असेल आणि ती दुकान/कार्यालय म्हणून वापरली जात असेल व त्याच ठिकाणी राहतात, तर ‘0’ (शून्य) नोंदवावे. जर एकच राहण्याची खोली अधिक एका कुटुंब वापरत असेल, तर त्या खोलीची गणना कोणत्याही कुटुंबासाठी करू नये..
[Audio] प्र. 16 : घरातील विवाहित जोडप्यांची संख्या “जोडपे’ हे लग्नाच्या माध्यमातून तयार होते. “लिव्ह-इन रिलेशनशिप” मध्ये (stable de-facto union) म्हणून एकत्र राहत असल्याचे आढळल्यास, अशा जोडप्यांची ‘विवाहित जोडपे’ म्हणून गणना करावी. घरातील विवाहित जोडप्यांची संख्या प्रविष्ट करा. - जोडपी जी सामान्य रहिवासी आहेत, जरी पती किंवा पत्नी यांपैकी एक व्यक्ती तात्पुरती गैरहजर असली तरी गणना करावी. - त्यांच्या वयाची पर्वा न करता, त्यांची गणना केली जाईल. जर एखादी व्यक्ती एकटी राहत असेल किंवा घरामध्ये कोणतेही विवाहित जोडपे नसेल, तर “शून्य (0)” असे नोंदवावे..
[Audio] .